'ठरलं तर मग' आजचा भाग १ एप्रिल Tharal Tar Mag Today's Episode Review
- लिंक पाएं
- X
- ईमेल
- दूसरे ऐप
'ठरलं तर मग' आजचा भाग १ एप्रिल Tharal Tar Mag Today's Episode Review
ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अस्मिता म्हणते ते सर्वकाही तन्वी ने केलं मी नाही त्यावेळी कल्पना म्हणते तन्वी माझी मुलगी नाहीये तू माझी मुलगी आहे अगं तुझ्यावर आम्ही एवढे दिवस जे काही संस्कार केलेत ना ते तर वाया जाऊ देऊ नकोस आणि तुझा प्रायचित्त हेच असेल या होळीसमोर तू आता सायलीची माफी मागायचीस त्यावेळी सायली म्हणते आई या सर्वांची गरज नाहीये. कल्पना म्हणते की सायली तू जरा थांब असं म्हणून ती अस्मिताला पुन्हा पुन्हा सांगू लागते की सायलीची माफी माग पटकन अस्मिता म्हणते मी अजिबात माफी मागणार नाहीये तेंव्हा प्रताप म्हणतो तुझ्या आईचा ही माफी माग कारण घरामध्ये जेव्हा आनंदाचे क्षण आले आहेत तेव्हा तुझ्यामुळे त्यावर विरजण पडलय आता आडवेढे न घेता लगेच तू सायलीची माफी माग असं प्रताप म्हणतो आता तिचाही नाईलाज होतो म्हणून ती पुढे येते आणि साईलीला म्हणते माझ्याकडून चूक झाली मला माफ कर असं म्हणून ती आता लगेच होळीमध्ये नारळी टाकते. सायलीचा तिला खूप राग आलेला असतो मग आता कल्पना म्हणते खऱ्या अर्थाने आता आपली होळी साजरी होईल घरातील सर्वांना आता आनंद झालेला असतो.
तर तिकडे होळी पेटलेली असते तर साक्षी होळी कडे पाहत असते तिला आता सर्व काही आठवत असतं कशाप्रकारे महिपत शिकरेला म्हणजेच अण्णांना शिक्षा मिळाली आता तिला अर्जुनचा प्रचंड राग आलेला असतो तिला कोर्टामधील सर्व प्रसंग देखील आठवत असतात तेव्हा ती नारळ हातात घेते आता रागातच ती म्हणते की अर्जुन सुभेदार तुझ्यामुळे माझ्या अण्णांना जेलमध्ये जावं लागले आता नाही तुझ्या कुटुंबाची मी राख रांगोळी केली ना तर माझे नाव नाही लावणार साक्षी महिपत शिखरे असं म्हणून ती होळीमध्ये नारळ टाकते व बोंबलू लागते व शपथ घेते की अर्जुनला मी असा सोडणार नाही मी त्याला बरबाद करून टाकणार.
इकडे सायली आणि अर्जुन दोघेही रूम मध्ये असतात तेव्हा सायली म्हणते सर तुम्ही उद्या हा पांढरा कुडता घाला कारण रंगपंचमीला पांढरा कुडताच घालतात त्यावेळी अर्जुन म्हणतो बर ठीक आहे आता सायली आश्रमातल्या रंगपंचमीच्या आठवणी अर्जुनला सांगू लागते अर्जुन म्हणतो आज होळी होती आज तुम्ही दमला नाहीत का सायली म्हणते माझ्यामध्ये अजून उत्साह आलाय कारण रंगपंचमी म्हटल्यावर आम्हा सर्वांना खूप आनंद व्हायचा हे तर रात्रीपर्यंत रंग खेळत असायचो आणि मग एकदा का ते रंग उधळले ना असं वाटायचं आपल्या आयुष्य सुद्धा असंच रंगीबेरंगी झाले आपल्या आयुष्यात कोणतेच प्रॉब्लेम नाहीयेत, त्यानंतर अर्जुन म्हणतो मला तर अजिबात रंग खेळायला आवडत नाही मी काय कोर्टामध्ये असा रंगीबेरंगी गाल घेऊन जायचं का? तिकडे माझा चेहरा म्हणजे माझी प्रॉपर्टी आहे त्यावर दुसऱ्या कोणी हक्क दाखवलेला मला अजिबात आवडत नाही असं म्हणून तो सायलीला रंगपंचमी खेळण्यासाठी स्पष्टपणे नकार देतो त्यावेळी सायली म्हणते गेल्यावर्षी तर तुम्ही खेळला होता ना तेव्हा अर्जुन म्हणतो हो खेळलो होतो कारण आपले नवीन लग्न झालं होतं त्यात मला सांगायचं होतं सर्वांना की माझं तुमच्यावर किती प्रेम आहे ते म्हणून खोटं खोटं रंग घेतला लावून त्यात काही बिघडलं, तेव्हा सायली आता खूप नाराज होते अर्जुन म्हणतो मला झोप आली अस म्हणून तो आता झोपण्याचं नाटक करतो तर सायली देखील आता झोपते आणि मनातल्या मनात विचार करू लागते की अर्जुन सरांना रंग खेळायला अजिबात आवडत नाही वाटतं अर्जुन हा डोकावून सायलीकडे पाहत असतो त्यावेळी अर्जुन मनातल्या मनात विचार करतो मला असं का वाटते पहिल्यांदाच की उद्या रंगपंचमी खेळावी मिसेस सायलीने मला रंग लावावा मी त्यांना लावावा त्यांच्याकडून लावून घ्यावा तर इकडे सायली विचार करत असते अर्जुन सरांना अजिबात रंग लावायला आवडत नाही हे मला माहीतच नव्हतं हे आता ते मलाही रंग लावणार नाही या विचाराने सायली आता डोकावूनही अर्जुन कडे पाहते नाही.
एडवोकेट नाईक घरी आलेले असतात साक्षी त्यांना ब्लँक चेक देते आणि म्हणते कोणत्याही परिस्थितीमध्ये माझे अण्णा जेल बाहेर आलेच पाहिजे तेव्हा सर्व पुरावे त्यांच्या विरोधात आहे मग आम्ही कसं करणार असं ते विचारतात तेव्हा साक्षी म्हणते पैसे फेकले की सर्व काही विकत घेता येतं आणि पुरावे सुद्धा नष्ट करता येतात कोणत्याही कारणा शिवाय अण्णा हे बाहेर आलेच पाहिजेत असं ती हट्टच करू लागते त्यावेळी त्यांचाही नाईलाज होतो आता चैतन्य तितक्यात तेथे तर साक्षी लगेच आपले रंग बदलते आणि मग ते काय म्हणालात तुम्ही एडवोकेट नाही मी अण्णांना बाहेर काढण्यासाठी मदत करू ते माझे वडील असले ना तरीही ते गुन्हेगार आहेत त्यांनी खूप मोठा गुन्हा केलाय आणि मी त्यांना बाहेर काढू शकत नाही असं ती आता लगेच रंग बदलत म्हणते कारण चैतन्य येथे आलेला असतो एडवोकेट नाईकांनाही काही कळत नाही ही साक्षी अशी काय बोलतीये चैतन्य साक्षीला रिलॅक्स व्हायला सांगतो आता चैतन्य हा साक्षीसाठी पाणी आणायला आत मध्ये जातो तर साक्षी म्हणते ऍडव्होकेट तुम्ही निघा आता असं म्हणून ती त्यांना जायला सांगते.
सुभेदाराच्या घरी सर्वजण छान तयार झालेले असतात रंग पंचमी खेळण्यासाठी सर्वजण आता तिथे येत असतात त्यावेळी सायलीचे लक्ष सारखा आत मध्ये असतं अर्जुन शिवाय तिला चैन सुद्धा पडत नसते सर्वजण त्या उत्सवात आता सहभागी झालेले असतात तेव्हा सायली मात्र जरा बाजूला जाऊन उभी राहते नजर सारखी अर्जुनला शोधत असते तर आता तिथे आलेले पाहुणे त्याचबरोबर घरातील सर्वजण मिळून आता रंगांची उधळण करतात गाण्यावर डान्स करू लागतात एकमेकांना रंग लावतात सायली मात्र फक्त आत मध्ये पाहते , इकडे अर्जुन देखील आता सायली कधी येते याची वाट पाहत असतो तो सायली काही येत नाही म्हणून अर्जुन खूप बेचन असतो तो रूममध्ये चकरा घालू लागतो इकडे सायली आता सारखी मागे पाहते अर्जुन येतो की काय दुसरीकडे अर्जुन रूम मध्ये असतो त्यानंतर तो दार उघडतो आणि बाहेर पाहतो घाबरूनच पटकन दार बंद करतो तो पाहत असतो सायली येते की काय पण ती आलेली नसते त्यामुळे तो म्हणतो की काय आहे मी रंग खेळायला गेलो नाही तर सायलीला काहीच फरक पडत नाही त्यांनी तर आता रंग खेळायला सुरुवात सुद्धा केली असेल आणि त्या म्युझिक वर डान्स सुद्धा करत असतील असं म्हणून अर्जुन एकदम शांत होतो आणि पुन्हा सायलीचाच विचार करत म्हणतो खरंच मिसेस सायलीने मला रंग खेळायला का बोलावलं नाही तर माझ्याशिवाय रंग लावून घेतील का दुसऱ्या कोणाकडून तो आता स्वतःशीच बोलतो की मिसेस सायली कमॉन तुम्ही या ना लवकर तुम्ही मला रंग लावायलाच पाहिजे अहो मला रंग खेळायला अजिबात आवडत नाही पण तुमच्याकडून मला रंग लावून घ्यायला आवडेल घरातील सर्वजण रंग खेळत असतात रंगपंचमी साजरी करत असतात त्यावेळी कल्पना म्हणते की आपण सायलीला रंगच लावला नाही विमल चल आपण सायलीला रंग लावूयात म्हणून त्या हात मागे घेतात आणि तिच्याकडे जातात आता तिला माहीत असतं की या दोघीही रंग लावायला आले आहेत त्यामुळे ती म्हणते अगोदर मला सरांकडून रंग लावून घ्यायचा आहे आणि मीच अगोदर सरांना रंग लावणार आहे जर ते आले नाही ना तर मी रंगपंचमी खेळणारच नाहीये असं म्हणून आता ती म्हणते आई प्लीज मला रंग नका लावू कल्पना खूप उत्साहाने पुढे सायलीला रंग लावण्यासाठी येते तेव्हा ती हात पकडते आणि म्हणते आई प्लीज मला अगोदर देवाला रंग लावू द्या आणि मगच मी तुम्हाला लावते चालेल ना तेव्हा ठीक आहे असं कल्पना म्हणते सायली लगेच आत मध्ये जाते ती आता मध्ये गेल्यानंतर अश्विन हॅप्पी रंगपंचमी असं म्हणून सायलीला रंग लावणार असतो ती म्हणते नको प्लीज मला अगोदर देवाला रंग लावायचा आहे मी आईना देखील तेच सांगितले अश्विन म्हणतो ठीक आहे मी तुमच्या आणि तुमच्या देवाच्या मध्ये येत नाही पण लवकर खाली या धुळवड साजरी करण्यासाठी तेव्हा ती ठीक आहे असं म्हणते आणि मनातल्या मनात विचार करू लागते सर प्लीज खोलीच्या बाहेर पडा मला तुम्हाला रंग लावायचा आहे आणि तुमच्याकडून रंग लावून घ्यायचा आहे त्याशिवाय मी रंग लावणारच नाहीये आता ती अर्जुनची वाट पाहत असते.
दुसरीकडे प्रिया मनातल्या मनात विचार करू लागते मला सुभेदाराच्या घरी जायचंय असं म्हणून तिला गेल्यावर्षीची प्रसंग आठवतात की धूळवडीच्या दिवशी मी पण पहिले होते तेव्हा खरी तन्वी आहे म्हणून आताही मला तिकडे जायचंय पण हा किल्लेदार इथेच बसलाय काय करावं कळत नाही तेवढ्यात अस्मिताचा मेसेज तिच्या मोबाईलवर येतो तू रंग खेळायला येतेस ना हा मेसेज वाचून प्रियाला अगदी रडूच येतात ती मनातल्या मनात विचार करते मला जायचं आहे पण किल्लेदाराला आता पटवावे लागेल त्यानंतर चेहरा पाडून प्रिया ही रविराज समोर जाऊन बसते तेव्हा तो विचारतो काय झालं ते पूर्णा आजीचा फोन आला होता तिने रंगपंचमी खेळण्यासाठी बोलावलंय त्यावेळी आता रविराज म्हणतो जायचं नाही तिकडे तेव्हा नागराज म्हणतो दादा जाऊ दे तिथे खूप माणसं असतील पाहुणे असतील अर्जुन असेल तिथे पण तिच्याकडे लक्ष देणार नाही तेव्हा रविराज तर मला त्याचीच भीती आहे जर अर्जुनने पाहिलं तर दोन-चार शब्द उगीच सुनावेल आणि त्याला राग येईल तेव्हा नागराज म्हणतो तुम्ही सांगितलं ना त्याचं नाही लक्ष जाणार तिच्याकडे तेव्हा ठीक आहे असं रविराज म्हणतो आणि प्रियाला जाण्याची लगेच परमिशन देतो तेव्हा ती खुश होते आणि लगेच जायला निघते.
दुसरीकडे सायलीला समजतं कल्पना आणि अश्विन समोरून मला रंग लावण्यासाठी आले आहेत ती लगेच मागे जाते तेव्हा अश्विन म्हणतो मला माहित आहे वहिनी तुला असं वाटतंय की दादांनीच पहिला रंग तुला लावावा असंच ना तेव्हा मम्मा तुला समजलं का आता वहिनीला कोण हवंय ते दादा पाहिजे तेव्हा हे दोघेही तिची गंमत करतात सायली गालातल्या गालात हसते मला म्हणते मग काय आज सायली वहीनी आपल्या रंगपंचमी खेळणारच नाही कारण अर्जुन दादा कधीही खेळत नाहीत पण आता कल्पना म्हणते सायली तुला आठवताना गेल्यावर्षी अर्जुन रंग खेळलाच नव्हता सायलीला आता गेल्यावर्षीच्या सर्व प्रसंग पाठवू लागतात ती गालातल्या गालात हसते ही अश्विन म्हणतो मीच आता जातो आणि दादाला बोलावून आणतो तेव्हा ठीक आहे असं सायली म्हणते आणि मनातल्या मनात विचार करू लागते की आता अश्विन भाऊजींना तरी इकडे घेऊन येण्यामध्ये यश येऊ देत देवा असं म्हणून ती आता अर्जुनची पुन्हा वाट पाहत थांबते.
इकडे अर्जुन रूम मध्ये असतो यावेळी अश्विन सारखा त्याला दार उघड दादा असं म्हणतो खूप प्रयत्न केल्यानंतरही अर्जुन बोलत नाही त्यामुळे तो सांगतो की ठीक आहे मी सायली वहिनीला आता सांगतो की तू रंगपंचमी खेळून घे कारण ती बिचारी तुझ्यासाठी एका कोपऱ्यात थांबली आहे तू कधी येतो याची वाट पाहत इकडे अर्जुन लगेच मनातल्या मनात विचार करतो म्हणजे मिसेस सायली माझ्यासाठी थांबले आहेत का तर दुसरीकडे अश्विन म्हणतो की दादा मी चाललो तुला काय करायचं ते कर बिचाऱ्या वहिनींना मी आता रंग खेळायला घेऊन जातो असं म्हणून तो तेथून जातो इकडे अर्जुनला आता खूपच आनंद झालेला असतो तो आता मनातल्या मनात विचार करतो तर मेसेस सायली पाहिले मला बोलवायला आल्या तर मी नक्कीच जाणार आहे कारण मीच त्यांना सांगितले की मला रंग खेळायला अजिबात आवडत नाही तो आता टेन्शनमध्ये असतो पुढील भागामध्ये प्रिया अर्जुना रंग लावणार असते तो म्हणतो नाही हा तन्वी मी फक्त माझ्या बायकोसाठी आलोय प्रिया म्हणते मी तुला इकडे घेऊन आलीये ना मग तो हक्क माझाच आहे आता सायली हा सर्व प्रकार पाहते आणि लगेच तेथे येते की अजिबात माझ्या नवऱ्यावर हक्क दाखवायचा नाही असं म्हणून प्रियाचा हात पीरगळते आणि तिला चांगलीच ताकीद देते की माझ्या नवऱ्यावर तुझा कधी हक्क नव्हता आणि नसणार आहे त्यामुळे त्यांच्यापासून नेहमी लांबच राहायचं आता अर्जुन सायली कडे पाहतच राहतो.
- लिंक पाएं
- X
- ईमेल
- दूसरे ऐप
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें
If you have any inquiry let me know.