'ठरलं तर मग' आजचा भाग २ एप्रिल २०२४ Tharal tar mag today's episode reviews.

Travloger is travel blogging website in Hindi and English will share you travel experience in India and around the world also you get details information about particular destination such as Attraction,specialty of that place,historical importance,geography,how to reach there,where to stay ,Shopping,amenity and complete travel guide etc. Travel Blogging in Hindi,Travel blogging in English .Travel video and experience ,Travloger.com in official website of vicky vloger you tube channel.
हिंदु धर्मात, गणपतीला प्रथम देवताचे स्थान आहे, महाराष्ट्रात गणपतीचे अष्टविनायक असे आठ प्राचीन मंदिर आहेत. पुणे जिल्ह्यातील ५, रायगड जिल्ह्यात दोन आणि अहमदनगर जिल्ह्यात एक मंदिर येते, म्हणून या ब्लॉगमध्ये आपल्याला अष्टविनायक बद्दल पूर्ण माहिती आहे.
१ मोरगाव मोरेश्वर- मोरगाव हे पुण्यापासून ७० कि.मी. अंतरावर पुणे-बारामती रस्त्यावर वसलेले आहे, हे येथील गणपतीला मोरेश्वर म्हणून ओळखले जाते, पौराणिक कथानुसार गणपती मोरावर बसून या ठिकाणी आले होते म्हणूनच येथील गणपतीला मोरेश्वर हे नाव प्राप्त झाले गणपतीच्या डोळ्यांत आणि बेंभी मध्ये हिरा बसवला आहें अष्टविनायकात मोरेश्वरला पहिले स्थान आहे.
2 सिद्धिविनायक सिद्धटेक- अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्या मध्ये भीमा नदीच्या काठी वसलेल्या या गावात सिद्धिविनायकचे अतिशय सुंदर मंदिर आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केले आहे . सिद्धटेक पुण्यापासून 103 किमी अंतरावर आहे.अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेची असणारी ही एकमेव मूर्ती असल्याने तिचे सोवळे कडक आहे.
3 बल्लाळेश्वर पाली हे पुण्यापासून १११ किमी आणि रायगड जिल्ह्यातील खोपोलीपासून 37 किमी अंतरावर आहे. हे मंदिर काळ्या दगडाने बांधलेले आहे.या मंदिरात चिमाजी अप्पांनी मंदिरासाठी दान केलेला भव्य घंटा आहेत.मंदिराच्या जवळ सुधागड आणि सरसगढ हा प्राचीन किल्ले आहेत, तसेच उरेन मध्ये गरम पाण्याचे झरे देखील आहेत.
4 वरदविनायक महाड हे पुणे-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खोपोली-खालापूर रोडवर आहे. हे मंदिर अतिशय साधे आहे. येथे गणपतीची डाव्या सोंडेची प्रतिमा आहे. हे मंदिर बाजीराव पेशवे यांनी १७२५ मध्ये बांधलेले आहे. महाडचा गणपती वरदविनायक म्हणून ओळखला जातो.
5 चिंतामणी थेऊर - थेऊर हे पुणे-सोलापूर रोडवर ३० कि.मी.अंतरावर आहे, थेऊरचा गणपती चिंतामणी म्हणून ओळखला जातो थोरले माधवराव पेशव्याची समाधी येथे आहे आणि माधवराव पेशवे यांचे जीवन चरित्र दर्शविणारे संग्रहालय देखील या ठिकाणी आहे.
६ गिरिजात्मक लेणाद्री -हे ओझरपासून केवळ १४ किमी, पुण्यापासून ९५ किमी आणि जुन्नरपासून ७ किमी अंतरावर आहे. हे गणपती मंदिर टेकडीवर वसलेले आहे, शिखरावर जाण्यासाठी ४०० हून अधिक पायऱ्या चढून जावे लागते हे मंदिर डोगरावर एका गुहेत आहे आणि त्यामध्ये गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. इतिहासकारांच्या मते ही एक प्राचीन बौद्ध लेणी आहे, नंतर त्याचे रुपांतर गणपती मंदिरात झाले आहे. जवळच छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ला देखील आहें.
7 विघ्नेश्वर ओझर -हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात पुण्यापासून सुमारे 45 कि.मी. अंतरावर असलेला पाचवा गणपती आहे. अष्टविनायकातील हा सर्वात श्रीमंत गणपती मानला जातो. मूर्तीचे कपाळावर हिरा आहें तर डोळ्यांत माणिक बसवलेले आहेत, हे मंदिर कुकरी नदीच्या काठावर थोरले बाजीराव पेशव्याचे भाऊ चिमाजी अप्पा यांनी बांधले आहे. भाविकांना येथे राहण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. जवळच आर्वी हे उपग्रह केंद्र आहे,या ठिकाणी आशियातील सर्वात मोठे दुर्बिणी कार्यरत आहे.
8 महागणपती रांजणगाव- पुणे-औरंगाबाद रस्त्यावर ६०किमी अंतरावर रांजणगावच्या महागणपतीचे एक सुंदर मंदिर आहे.या गणपतीला महागणपती नावाने ओळखले जाते महागणपतींचे दहा हात आहेत आणि गणपती कमळाच्या फुलावर विराजमान आहेत, ही मूर्ती दहाव्या शतकातील असून हा डाव्या सोंडेचा गणपती आहे.
अष्टविनायक दर्शन यात्रा महाराष्ट्रातील अनेक स्थानिक टूर ऑपरेटर आयोजित करतात,तर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे देखील अष्टविनायक दर्शन सहल आयोजित केली जाते.
Click below link to watch Complete Video
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें
If you have any inquiry let me know.